in

५० लाख रुपये द्या अन्यथा वैद्यनाथ मंदिर उडवू; धमकीच्या पत्राने खळबळ

बीड : 50 लाख रुपये द्या अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळताच देवस्थानमध्ये एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात, आत्तापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे.

हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन, अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्ज माफियाच्या धमकीच्या पत्राने शुक्रवारी एकच खळबळ उडाली.संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे.

या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व पर राज्यातून भाविक येतात. मार्च २०२० पासून हे मंदिर कोविडमुळे बंद ठेवण्यात आले होते. महिनाभरापूर्वी मंदिरे उघडण्याचा निर्णय झाल्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले. सध्या मंदिरात भाविकांची गर्दी आहे.शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने (रा. काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड) या पत्त्यावरुन हे पत्र आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Rain Alert ; 29 व 30 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हयात पावसाची शक्यता

कुंभार्ली घाट बनला मृत्यूचा सापळा