देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसने थेट गुजरातमधील परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तृणमूल काँग्रेसने गुजरातमधील एका सरकारी रुग्णालयातील भीषण परिस्थिती दाखवणारा व्हिडीओ शेअर करत जोरदार निशाणा साधला आहे.
तृणमूल काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. “या धक्कादायक व्हिडीओमध्ये रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास होताना दिसत आहे. गुजरातच्या भावनगरमधील सरकारी रुग्णालयामध्ये रुग्ण जमिनीवर पडून आहेत. या व्हिडीओ सोबत जर हे सोनार गुजरात असेल तर आम्हाला माफ करा आम्हाला सोनार बांगला नकोय” असे कॅप्शन देण्यात आले आहे.
Comments
Loading…