in ,

अमेरिकेनं G7 समिट पुढे ढकललं; भारतासह ‘या’ देशांच्या सहभागासाठी आग्रह

Share

वॉशिंग्टन: कोरोनामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचे 46 वे G7 शिखर संमेलन लांबणीवर पडले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे संमेलन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जुनच्या शेवटच्या आठवड्यात होणारी G7 समिट बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

ट्रम्प यांनी तेथील स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, G7 शिखर संमेलन 10 जून ते 12 जून दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार होते. मात्र, जगभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता हे संमेलन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही देशांचीच G7 संघटना असली तरी देखील संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व हे संमेलन करू शकणार नाही. त्याचबरोबर G7चा फॉर्मेट आऊटडेटेड झाल्याचंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय.

दरम्यान, G7 मध्ये असलेले सध्याचे देश जगाला मार्गदर्शन करण्यास तितकेसे कार्यक्षम नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोना प्रभावित देशांचं चीनबद्दलचं मत जाणून घेणं गरजेचं आहे असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. इतर देशांमधील सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी ट्रम्प भारतासह ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरियाला देखील आमंत्रित करणार आहेत.

G7 या संघटनेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका आहेत. जगातील सात विकसित देशांचा हा एक अभिजात वर्ग आहे. ही संघटना जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा ठरवते. या देशांचा व्याप जगातील जीडीपीच्या 40 टक्के आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

BCCI ने खेल रत्न, अर्जुन पुरस्कारासाठी केलीयं ‘या’ 4 खेळाडूंची निवड

World No Tobacco Day; ग्रामस्थांची तंबाखूमुक्ती कडे वाटचाल