in

TRP Scam : BARC चा मोठा निर्णय, तीन महिने TRP ला स्थगिती

Share

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटस (TRP) घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने (बीएआरसी) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी मूल्यमापनावर तीन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडून स्वागत करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. टीआरपीसाठी वाहिन्यांकडून सुरु असलेला हा गैरप्रकार समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे BARC सह संबंधित यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या. या सगळ्या प्रकारानंतर BARCच्या संचालक मंडळाकडून भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीकडून टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल, याचा आढावा घेतला जाईल. देशातील सर्व भाषांतील वृत्तवाहिन्यांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठीच BARCकडून तीन महिने टीआरपीचे आकडे जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

TRP Scam | अर्णब गोस्वामींना दुसऱ्यांदा विशेषाधिकार भंग केल्याची नोटीस

Start a gym; Now the demand of Supriya Sule

कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार – सुप्रिया सुळे