in

सुशांत सिंह राजपूतला, क्रीडाविश्वातून श्रद्धांजली

Share

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली. या घटनेने बॉलीवुड शोककळा पसरली आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांतसिंग राजपूत प्रसिद्धीच्या झोतात आला होतात. त्यांनतर त्याने ‘क्या पो छे!’ या चित्रपटात काम केले. यामध्ये तो मुख्य अभिनेता होता.

तसेच महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातही काम केलं होतं. त्याच्या या अभिनयाची साऱ्यांनीच वाहवा केली. स्वत: धोनीनेदेखील त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता.

आपल्या करीयरच्या उत्तुंग शिखरावर असताना त्याने हा निर्णय का घेतला हा मोठा प्रश्न आहे. मात्र सुशांत च्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडने एक तरुण अभिनेता गमावला आहे.


सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्यमुळे बॉलिवूडसोबत क्रिडाक्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी श्रद्धांजली वाहीली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Sushant Singh Rajput Suicide : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पीपीई किट्सचे वाटप