in

ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

ठाणे-घोडबंदर महामार्ग आणि ठाणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या महामार्गावर 10 ते 15 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा गेल्या तीन तासांपासून वाहतूक कोंडीत खोळंबा झाला आहे. पाऊस आणि चिखल यामुळे प्रवाशांना गाडीत बसून रहावे लागत असल्याने त्यांचा संतापाचा पारा चढला आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच MMRDA, PWD व महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांवर केलेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाचा वाहनधारकांना फटका तर भर दिवसा जड वाहने रस्त्यांवर सोडल्याने वाहतुक कोंडी झाली असे समजत आहे.

ठाणे-नाशिक आणि घोडबंद ते नाशिक महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत लांबच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गेल्या 3 तासापासून वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातून गाडी चालवणं प्रवाशाना कठिण होऊन बसलं आहे. त्यामुळेच या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. एमएमआरडीए प्रशासनाने हा रस्ता बांधला आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, सकाळपासून ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतरही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी वाहतूक विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी कशी सुटणार? असा सवाल केला जात आहे. एमएमआरडीने या महामार्गाचं काँक्रिटीकरण करावं, चांगले रस्ते बनवावेत, पाऊस थांबल्याबरोबर एमएमआरडीएने हे काम हाती घ्यावं, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एमएमआरडीएने दोन तीनवेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे रस्त्याचे काँक्रिटीकरण हाच त्यावर एकमेव पर्याय आहे, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या अभियंतांना कामाविषयी सूचना
दरम्यान जुलैमध्येच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी केली होती. माजीवडा मानपाडा प्रभाग समिती, तीन हात नाका, टिपटॉप प्लाझा, सेवा रस्ता लुईसवाडी, एलबीएस मार्ग आणि इतर ठिकाणांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. तसेच कामाची गती व दर्जा याविषयी अभियंत्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, हा महामार्ग एमएमआरडीच्या अंतर्गत येत असल्याने एमएमआरडीएने महामार्गाचं काँक्रीटीकरण करण्याऐवजी केवळ खड्डे बुजवून काम भागवलं. त्यामुळेच पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडल्याचं सांगितलं जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट बनावट’ !

50 Thousand Compensation| कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मिळेल 50 हजारांची भरपाई