in

48 तासांत मुसळधार पाऊस; तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Torrential rain in 48 hours; Orange alert to three districts
Torrential rain in 48 hours; Orange alert to three districts
Share

गेल्या आठवड्यात राज्याला झोडपून काढणारा पाऊस पुन्हा एकदा जोरदार आगमन करणार आहे. पुढच्या 24 ते 48 तासांत ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुंबईतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पावसाने काही तास विश्रांती घेतली होती. पण मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. या दोन ते तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सर्वांचीच दयनीय अवस्था केली होती.

आता हा पाऊस पुन्हा एकदा मुंबईसह कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, सॅटेलाईट इमेजवरून पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झालेली स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे पूर्ण किनारपट्टी भागात पुढच्या दोन दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मनसेने चाकरमान्यांसाठी ठाणे,मिरा-भाईदर मधून सोडल्या मोफत बस

क्रिकेट विश्वाला मोठा धक्का; डेल स्टेन सारखी बॉलिंगची प्रतिभा असलेला गमावला खेळाडू