in

Toolkit | फरार निकिता जेकब विरुद्ध काढले वॉरंट

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत सरकार विरोधात वातावरण तापवण्यासाठी टूलकिट विकसित करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात झाली आहे. टूलकिट प्रकरणात फरार असलेल्या निकिता जेकब विरोधात दिल्ली पोलिसांनी वॉरंट काढले आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी पर्यावरण रक्षणाचे सामाजिक कार्य करते अशी ओळख सांगणाऱ्या दिशा रवी हिला टूलकिटचे संपादन केल्याप्रकरणी अटक केली. दिशाला ५ दिवसांची पोलीस कोठडी झाली.

दिल्ली पोलिसांनी स्पेशल सेलने १० फेब्रुवारी रोजी मुंबईत वकील असलेल्या निकिता जेकब हिच्या घरावर छापा टाकला. यावेळी निकिताने तपासात सहकार्य करेन असे आश्वासन दिले. याच कारणामुळे निकिताला पोलिसांनी अटक करणे टाळले. यानंतर संधी साधून निकिता फरार झाली. अद्याप निकिता सापडलेली नाही. दिल्ली पोलिसांनी निकिताचा शोध सुरू केला असून तिच्याविरोधात वॉरंट काढले आहे.

निकिता जेकब खलिस्तान समर्थकांच्या संपर्कात होती. टूलकिटसाठी निकिताने दिशा आणि अन्य काही जमांची मदत घेतली. वकील असलेली निकिता टूलकिट संदर्भात खलिस्तान समर्थक पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा संस्थापक एमओ धालिवाल याच्याशी चर्चा करत होती. निकिता पुनीत नावाच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून धालिवालच्या संपर्कात आली होती.

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या दिशाची ग्रेटा थनबर्ग हिच्याशी ओळख आहे. या ओळखीचा फायदा करुन घेतला तर भारत सरकार विरोधात जगभर वातावरण तापवणे सोपे होईल, असे मत निकिताने व्यक्त केले. यानंतर धालिवालकडून हिरवा कंदिल मिळताच निकिताने दिशाला सोबत घेतले. निकिता आणि दिशा या दोघीजणी टूलकिट प्रकरणाशी संबंधित आहेत. पोलिसांनी छापा टाकला म्हणजे लवकरच अटक होणार आणि अडचणी वाढणार याचा अंदाज येताच निकिता फरार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पोलिस हवलदार संतोष पाटील यांची आत्महत्या

टूलकिट प्रकरण : अटकपूर्व जामिनासाठी निकिता जेकब आणि शंतनू न्यायालयात