किसान आंदोलनात खलिस्तानी लिंक ते टूलकिट प्रकरणी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, पोलीस आपली जबाबदारी आणि काम योग्य पद्धतीने करत आहे. कोणत्याही व्यक्तीने गुन्हा केला, तर त्याचे वय आणि प्रोफेशन पाहावे का, असा सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला.
पोलिसांनी कारवाई करताना वय, प्रोफेशन पाहणे चुकीचे आहे, असे सांगत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर अमित शहा यांनी टीका केली. कोणाला यात चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी न्यायालयात जावे. कायदेशीर कारवाईवर टीका करणे, प्रश्न उपस्थित करणे आताच्या घडीला फॅशन झाली आहे. कोणतीही तपास संस्था प्रोफेशनली काम करत असेल, तर सवाल उपस्थित करता कामा नये, असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले.
गुन्हेगारावर कारवाई करताना वय, प्रोफेशन, लिंग पाहून गुन्हा दाखल केला जात नाही. प्राथमिक माहिती अहवाल चुकीचा वाटत असल्यास यासंदर्भात न्यायालयात जावे. देशभरात अनेकांचे वय २१ वर्षे आहे. पण दिशा रवि हिलाच का अटक करण्यात आली, असा प्रतिप्रश्न अमित शहा यांनी केला आहे.
Comments
Loading…