in

Tokyo Paralympics: कृष्णा नागरचं सुवर्णपदक; सुहास यथिराजनं पटकावलं रौप्य

टोक्यो पॅरालिम्पिकच्या समारोपाच्या दिवशी पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराजने रौप्यपदक जिंकल्यानंतर आता आणखी एक पदक भारताच्या नावावर झालं आहे. कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकलं असून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यासोबत भारताच्या पदकसंख्येने १९ हा विक्रमी आकडा गाठला आहे.
कृष्णा नागरच्या विजयासोबतच भारताच्या खात्यात ५ सुवर्णपदकं, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश झाला आहे.

कृष्णा नागरने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा परभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. याआधी विश्वविजेत्या प्रमोद भगतने शनिवारी पॅरालिम्पिकमधील पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल३ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली.

सुहास यशिराजने समारोपाच्या दिवशी रौप्यपदक जिंकलं. सुहासला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. मात्र पराभव झाल्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं. सुहास यथिराज आयएएस अधिकारी असून टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला आहे. सुहास यथिराज पदक जिंकणारा पहिला आयएएस अधिकारी ठरला आहे. अंतिम सामन्यात सुहास यशिराजसमोर फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरचं आव्हान होतं. याआधी सुहासने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानवर २१-९, २१-१५ अशा ३१ मिनिटांमध्ये विजय मिळवला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार; सतर्कतेचं आवाहन

‘ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही गोष्टी साध्य करून घेतंय’