in

Petrol Diesel Price | महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पार, नवे दर काय?

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये आज (सोमवार, 7 जून 2021) पेट्रोल दरात प्रतिलीटर 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 27 पैशांनी वाढला आहे.

सध्या बऱ्याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. तर डिझेलची किंमत ही प्रतिलीटर 90 रुपयांच्या पुढे गेली आहे. गेल्या 21 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत पेट्रोल प्रतिलीटर 4.99 रुपयांनी महाग झाले आहे. तर डिझेल प्रतिलीटर 5.44रुपयांनी महाग झाले आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 101.13 ₹ 91.69
2 अकोला ₹ 100.85 ₹ 91.46
3 अमरावती ₹ 102.01 ₹ 92.57
4 औरंगाबाद ₹ 102.17 ₹ 94.18
5 भंडारा ₹ 101.75 ₹ 92.33
6 बीड ₹ 101.19 ₹ 91.76
7 बुलडाणा ₹ 102.28 ₹ 92.81
8 चंद्रपूर ₹ 101.61 ₹ 92.19
9 धुळे ₹ 101.28 ₹ 91.86
10 गडचिरोली ₹ 101.87 ₹ 92.45
11 गोंदिया ₹ 101.81 ₹ 92.38
12 मुंबई उपनगर ₹ 101.09 ₹ 93.09
13 हिंगोली ₹ 102.14 ₹ 92.70
14 जळगाव ₹ 101.46 ₹ 92.02
15 जालना ₹ 102.08 ₹ 92.62
16 कोल्हापूर ₹ 100.92 ₹ 91.52
17 लातूर ₹ 101.90 ₹ 92.46
18 मुंबई शहर ₹ 100.98 ₹ 92.99
19 नागपूर ₹ 100.99 ₹ 91.60
20 नांदेड ₹ 103.27 ₹ 93.78
21 नंदूरबार ₹ 101.91 ₹ 92.47
22 नाशिक ₹ 101.36 ₹ 91.92
23 उस्मानाबाद ₹ 101.41 ₹ 91.99
24 पालघर ₹ 100.75 ₹ 91.31
25 परभणी ₹ 103.30 ₹ 93.79
26 पुणे ₹ 101.38 ₹ 91.94
27 रायगड ₹ 100.68 ₹ 91.24
28 रत्नागिरी ₹ 101.80 ₹ 92.31
29 सांगली ₹ 100.73 ₹ 91.35
30 सातारा ₹ 101.66 ₹ 92.24
31 सिंधुदुर्ग ₹ 102.47 ₹ 93.01
32 सोलापूर ₹ 101.11 ₹ 91.71
33 ठाणे ₹ 100.68 ₹ 91.24
34 वर्धा ₹ 101.01 ₹ 91.61
35 वाशिम ₹ 101.60 ₹ 92.19
36 यवतमाळ ₹ 102.28 ₹ 92.84
दररोज 6 वाजता किमती बदलतात

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण करण्यात ‘कोव्हिशिल्ड’ ‘कोव्हॅक्सिन’पेक्षा सरस

पाकिस्तानात दोन रेल्वे गाड्यांची धडक, ३० प्रवासी ठार