in

कोकणात पोहचण्यासाठी चाकरमान्यांचा आजचा शेवटचा दिवस

Today is the last day for the servants to reach Konkan
Today is the last day for the servants to reach Konkan
Share

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांनसाठी एसटीने 6 ते 12 ऑगस्ट अखेरपर्यंत 550 बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत .मात्र या सेवेची मुदत वाढविण्यात आली आहे. आता 13 ते 21 ऑगस्टपर्यंत कोकणात चाकरमान्यांना जाता येणार आहे. मात्र उद्यापासून (13 ) प्रवास करणार्‍या चाकरमान्यांना कोरोनाची चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे कोकणात पोहचण्यासाठी चाकरमान्यांकडे आजचा शेवटचा दिवस असणार आहे.

गौरी गणपतीच्या उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांनासाठी एसटी बसेस सुरु झाल्या आहेत. 6 ऑगस्ट पासून सुरु झालेल्या या बससेवेत आतापर्यत 10 हजार पेक्षा जास्त प्रवाशांनी एसटीचे आगाऊ आरक्षित केले. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता या बस सेवेत मुदतवाढ करून 13 ते 21 ऑगस्टपर्यंत एसटी चालविण्यात येणार आहे. तथापि, सदर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असून सदर चाचणी निगेटिव्ह असल्यास संबंधितांना प्रवास करता येईल. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोरोना चीचाचणी पॉझिटिव्ह (सकारात्मक)आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच प्रवासासाठी स्वतंत्र रित्याई-पासची आवश्यकता नाही असे महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

जिल्हा परिषद पालघरमध्ये भरती

मनसेने चाकरमान्यांसाठी ठाणे,मिरा-भाईदर मधून सोडल्या मोफत बस