in

70 च्या दशकातील बॉलीवूडच्या ‘मदर इंडिया’ सुलोचनादीदींचा आज वाढदिवस…

Share

सुलोचना लाटकर म्हणजेच सुलोचनादीदी यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी बेळगाव येथे झाला. सुलोचना यांनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी म्हणजेच 1946 ला या रुपेरी दुनियेत पदार्पण केलं. मराठीतील सासुरवास हा त्यांचा पहिला सिनेमा ठरला. त्यानंतर मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी मराठीत अनेक उत्तमोत्तम सिनेमे दिले जसे 1953 साली रिलीज झालेला ”वहिणीच्या बांगड्या”, ”मीठ भाकर”, 1959 ला गाजलेला सिनेमा ”सांगते ऐका” त्याच सोबत ”लक्ष्मी आली घरा”, ”मोठी माणसे”, ”जिवाचा सखा”, ”पतिव्रता”, ”सुखाचे सोबती”, ”भाऊबीज”, ”आकाश गंगा” आणि ”धाकटी जाऊ” हे त्यांचे गाजलेले सिनेमे ठरतात. याच दरम्यान त्यांनी बॉलीवूड मध्ये सुद्धा आपली छाप पाडायला सुरुवात केली. मात्र बॉलिवूडमध्ये त्या नावारूपास आल्या ते त्यांनी साकारलेल्या अनेक सिनेमांमध्ये आईच्या पात्रा मुळे. 1959 मध्ये बॉलिवुडच्या ”दील देके देखो” सिनेमात त्या झळकल्या आणि 1995 पर्यंत त्यांनी बॉलिवूड सिनेमात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. एखाद्या बॉलिवूड सिनेमामध्ये हिरोची आई म्हटल्यावर त्याकाळी निरुपमा रॉय आणि सुलोचना लाटकर यांचीच नावे घेतली जात. 

सुलोचना यांना 1999 ला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच 2004 साली त्यांना फिल्मफेअरचा लाइफ टाइम अचीव्हमेंट पुरस्कार सुद्धा देण्यात आला. चित्रपट महामंडळाने 2003 साली त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. तर 2009 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारांने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळताच त्यांच्या तोंडून, ‘हा तर माझा माहेरचा आहेर’ असे उद्गार एका मुलाखतीमध्ये निघाले होते.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या एरवी कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी नसलेल्या वैयक्तिक आयुष्यात एकदाच वादळ निर्माण झालं जेव्हा त्यांची लेक कांचन यांनी काशिनाथ घाणेकर यांच्याशी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

पडद्यावरची ‘बेस्ट’ आई कोण, यावर ‘पोल’ घेतला तर दीदी बिनविरोध ‘मदर इंडिया’ ठरतील. त्यामागे आई म्हणून केलेल्या भूमिकांचं संख्याबाहुल्य असेल, तशीच विश्वासार्हताही असेल. ‘एकटी’ आणि ‘मोलकरीण’ या चित्रपटांमधून त्या आधी महाराष्ट्राच्या आई झाल्या आणि नंतर यथावकाश ‘मदर इंडिया’ झाल्या. तब्बल पन्नास मराठी सिनेमे आणि अडीचशेच्या वर बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेल्या सुलोचनादीदी यांना गेल्या वर्षी म्हणजेच 2019 ला मनोरंजन विश्वात सर्वोत्कृष्ट मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा यासाठी एक मोहीम राबवण्यात आली. वयाच्या 91 व्या वर्षी तरी त्यांना हा पुरस्कार मिळेल असं वाटत असतानाच मात्र हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला. 1946 ते 1995 दरम्यान उत्तमोत्तम  सिनेमा देऊन आपली एक वेगळी छाप निर्माण करणाऱ्या सुलोचना लाटकर आज वयाच्या 92 व्या वर्षी सुद्धा या दादासाहेब फाळके पुरस्काराची वाट नक्कीच पाहत असतील.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Riya seeks help from most expensive lawyer to escape charges

आरोपातून वाचण्यासाठी रियाने मागितली सर्वात महागड्या वकिलाची मदत, दिवसाला घेतात इतके लाख रुपये

आयपीएलची उत्सुकता; ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती