in

Today Gold-silver price । सोने पुन्हा एकदा स्वस्त; चांदीच्या दरात 800 रुपयांची घसरण

Share

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे सोन्याचे भाव पुन्हा एकदा उतरले आहेत. सोन्याच्या दरात घसरण झाली असून, चांदीसुद्धा 800 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सुवर्ण बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत आज तीव्र घट झाली. सकाळी 09.30 वाजता मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (MCX)वर सोन्याच्या भावात 10 ग्रॅमसाठी 441 रुपयांची घसरण झाली. सोने आज 50085.00 रुपयांवर व्यापार करत होते. त्याचबरोबर चांदी 881.00 रुपयांनी घसरून 59690.00 रुपये प्रतिकिलोवर व्यापार करीत आहे.

मंगळवारी दिल्लीतील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे भाव 454 रुपयांनी वाढून 51,879 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1900 डॉलरवर बंद झाले. मंगळवारी एक किलो चांदीचा दर 751 रुपयांनी वाढून 63,127 रुपये प्रतिकिलो झाला. बाजार तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते. सोन्याचे भाव दहा ग्रॅमसाठी 48 हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. त्याचबरोबर दिवाळीपर्यंत पुन्हा एकदा सोने महाग होण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या अखेरीस सोने उच्चांकी पातळी गाठू शकते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

उद्या परदेशातून मूर्त्या आल्या तर; राज ठाकरेंच्या मूर्तीकारांना सूचना

मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंनी मारली दांडी