in

Gold Price | सलग दुसर्‍या दिवशी सोनं महागलं

मागील आठवड्यांपासून सोनाच्या किंतीमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजारात सलग दुसर्‍या दिवशी सोने-चांदीच्या किमती वाढल्यात. जागतिक मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानंतर राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 285 रुपयांची वाढ झाली.

दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमती प्रति किलो 952 रुपयांची वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 285 रुपयांनी वाढून 48,892 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,607 रुपयांवर बंद झाले होते. तर दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 952 रुपयांनी वाढून 71,850 रुपये प्रति किलो झाला. गेल्या व्यापार सत्रात चांदीची किंमत 70,898 रुपये प्रति किलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति औंस 1,912 डॉलर झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता विमानतळावर RT-PCR चाचणी बंद

BMC global tender | महापालिकेचे ग्लोबल टेंडर गुंडाळणार?