in

‘…मग ममता बॅनर्जींना विरोधी पक्ष स्वीकारतो का पाहा’

तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करावे आणि त्यानंतरच विरोधक त्यांना आपला नेता मानतात की नाही हे ठरवले जाईल अशी टीका भाजपातर्फे करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली उडवत भाजपाने हे वक्तव्य केलं आहे.

भाजपाच्या बंगाल युनिटचे अध्यक्ष सुकांता मजुमदार म्हणाले की, ममतांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवावे. ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री असतील तर त्यांनी दिल्लीत जाऊन मंत्री आणि पंतप्रधानांची भेट घ्यायची हे ठरले आहे. प्रत्येक मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन राज्याच्या विकासासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटतो, असेही मजुमदार म्हणाले. ‘जोपर्यंत ममतांचा विरोधी पक्षाचा चेहरा असण्याचा प्रश्न आहे, टीएमसीने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. त्यानंतर विरोधी पक्ष त्यांना नेता म्हणून स्वीकारतात की नाही हे ठरेल. आमच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचा चेहरा स्थिर आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी’, असे मजुमदार म्हणाले.

सोमवारी दिल्लीत पोहोचलेल्या ममता बॅनर्जी या गुरुवारपर्यंत राजधानीतच असणार आहेत. बुधवारी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान त्या बीएसएफची व्याप्ती वाढवण्याबाबत आणि राज्याच्या विकासाबाबत पंतप्रधान मोदींशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ममता बॅनर्जींना तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष बनवायचा आहे, असे मजुमदार म्हणाले. यासाठी त्या त्यांच्या नेत्यांना वेगवेगळ्या राज्यात पाठवत आहे. बंगालमधील हिंसाचाराच्या माध्यमातून ममता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या असून आता हा हिंसाचार देशभरात नेऊ इच्छित असल्याचे मजुमदार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वारजे माळवाडीत एकाचा खून, तर एक जण गंभीर जखमी

गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी