सोशल मीडियावरील ट्रेंण्ड्स हा खरंतर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. एखाद्या ट्रेण्डवरुन नेटकरी भन्नाट मिम्स बनवत असतात. आता तृणमूल काँग्रेसनं बंगाल भाजपाला अशाच पद्धतीनं मिश्किल टोमणा लगावला आहे.
‘यह बंगाल बीजेपी है, यह उनकी जनसभा है, और यहाँ इनकी PAWRI हो रही है’. असा कॅप्शन देत तृणमूल काँग्रेसनं एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत भाजपाची सभा होत असून समोरील खूर्च्यांवर केवळ एकच माणूस बसलेला असून इतर सर्व खुर्च्या रिकाम्या आहेत. यावरूनच तृणमूल काँग्रेसनं भाजपावर निशाणा साधला आहे.
भाजपाच्या या फोटोवर अनेकांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. शशी थरुर यांनीसुद्धा या फोटो टि्वट करत लिहिलं आहे की, ‘व्यासपीठावर ५ लोक आहेत. पाठीमागे ७ जणांचं पोस्टर आहे आणि श्रोत्यांमध्ये केवळ एकच माणूस बसला आहे आणि हे केरळ राज्यसुद्धा नाही’ असा टोला थरूर यांनी लगावला आहे.
कसा सुरू झाला ट्रेण्ड?
पाकिस्तानी तरुणीनं गेल्या महिन्यात एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत ही तरुणी म्हणते, ‘ये हमारी कार है, ये हम है, और ये हमारी PAWRI हो रही हैं’ असं म्हणत तिनं १५ सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यानंतर या विषयावर अनेक मिम्स बनवले गेले.
Comments
Loading…