in

“वेळीच सावरा अन्यथा परिस्थिती आणखी हाताबाहेर जाणार” – WHOचा इशारा

कोरोनाची दुसरी लाट जरी कमी होत असली तरी जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. करोनाचा अजूनही संपूर्ण नायनाट करण्यात कोणत्याही देशाला यश आले नाही. त्यातच हा विषाणू रोज नवीन रूप धारण करत आणखी तीव्र होत असताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. वेगाने पसरणारा डेल्टाचा प्रकार, जो आधीच भारतात सापडला आहे, आता १३२ देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले.

डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. ‘डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा एक इशारा आहे की हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी ही याबाबत भाष्य केले आहे. ‘आतापर्यंत, चार चिंताजनक करोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखी येत राहतील. डब्ल्यूएचओच्या सहापैकी पाच क्षेत्रांमध्ये, गेल्या चार आठवड्यांत सरासरी संसर्ग ८० टक्क्यांनी वाढला आहे, असे टेड्रॉस म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जम्मू-काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्याचा खात्मा

भारतात लवकरच लाँच होणार RedmiBook 15 लॅपटॉप