in

अहमदनगर जिल्ह्यात एकाच कुटुंबात तिघांची आत्महत्या

अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येनं हादरुन गेलं आहे. केडगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी केडगाव देवी रोडवरील अथर्व नगर येथे ही घटना घडली. आर्थिक विवंचेनेतून ही आत्महत्या करण्यात आली आहे. अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे.

मृतांमध्ये आई-वडिलांसह 10 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. आधी मुलीला गळफास देऊन नंतर पती-पत्नीने गळफास लावून घेतल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. संदीप दिनकर फाटक (वय 40) किरण संदीप फाटक (वय32) व मैथिली संदीप फाटक (वय 10) अशी मृतांची नावं आहे. पालकांनी प्रथम आपल्या मुलीला गळफास लावला आणि त्यानंतर आपली जीवनयात्रा संपली अशी सूत्रांची माहिती आहे. मृत केडगावमधील मोहिनीनगर भागात राहत असून संदीप हे व्यावसायिक होते.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांना चिठ्ठीही सापडली आहे. अधिक तपास सुरु आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तसंच शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ

मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण