लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजपा आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. तथापि, अशा धमक्यांनी मी बधणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुळची परळीची असलेली 22 वर्षीय पूजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी (7 फेब्रुवारी) मध्यरात्री 1 च्या सुमारास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच वाटेतच तिचा मूत्यू झाला. तिच्या आत्महत्येशी बड्या नेत्यांचे संबंध असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपाने सखोल चौकशीची मागणी केली आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तशी ग्वाही दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे कालपासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
Comments
Loading…