कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याचपार्श्वभूमीवर पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा विचार सुरु आहे. नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ येऊ शकते असे संकेत वडेट्टीवार यांनी दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. मात्र नागरिक अजूनही विना मास्कचे फिरत आहेत. परिणामी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र असंच सुरु राहिलं तर आगामी काळात कठोर निर्णय घ्यावे लागतील. परिणामी कोरोनाची अशीच परिस्थिती राहिली तर संध्याकाळी ६ ते सकाळी ९ पर्यंत नाईट कर्फ्यूचा विचार करावा लागेल अशी महिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
Comments
Loading…