in ,

काटा काढणाऱ्यांचा काट्यानं काटा काढणार; शिवेंद्रराजेंची कार्यक्रमात धमकी

लोकशाही न्यूज नेटवर्क

सातारच्या विकासकामासाठी राष्ट्रवादीतून भाजप मध्ये गेलेले आमदार शिवेंद्रराजे भोसले हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? याविषयी सर्वत्र चर्चा रंगली आहे. जावलीमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात शिवेंद्रराजेनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

नाव न घेता त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावलं आहे. शिवेंद्रराजे म्हणाले की, काटा काढणाऱ्यांचा काट्यानं काटा काढण्याची आपली भूमिका असून वाट लावणाऱ्यांना संपवणार, शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे.” असल्याची धमकी त्यांनी यावेळी दिली आहे.

शिवेंद्रराजे काय म्हणाले ?

जावलीमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात शिवेंद्रराजे म्हणाले की, “माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आरक्षणासाठी आज निघणार संघर्ष यात्रा

कोणत्याही देशाच्या सरकारने शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलेलं नाही, लोकसभेत मोदी सरकारचं स्पष्टीकरण