in

पुणेकरांवर 2 एप्रिलपर्यंत असणार ‘हे’ निर्बंध

पुण्यात कोरोनाचा विस्फोट होत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे आज पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक बोलावून निर्बंध लावण्यात आले.

या बैठ्कीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी साधारण 50 टक्के खासगी रुग्णालयांचे बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. ससून रूग्णालयात 300 बेड उपलब्ध होते आता 500 बेड उपलब्ध करणार आहोत. तसेच सद्यस्थितीत शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाची 300 केंद्र आहेत आता ही केंद्र दुप्पट करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

नियमावली काय ?

  • येत्या 1 एप्रिलपासून राजकीय, लोकप्रतिनिधी, स्वराज संस्था यांचे खाजगी कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिले.
  • लग्नसमारंभात ५० पेक्षा जास्त पाहुण्यांना परवानगी नाही.
  • अंतयात्रेत 20 च्या वर नागरिकांना सहभागी होता येणार नाही.
  • शाळा महाविद्यालय ३० एप्रिलपर्यत बंद होती. मात्र आता शाळा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.
  • चित्रपट गृहात 50 टक्के उपस्थिती ठेवावी.
  • शहर व ग्रामीण भागातील बस सेवा सुरु राहणार.
  • 10,12 वी च्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय 1 एप्रिल नंतर, उप मुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

Bhandup Hospital Fire; दोषींवर कठोर कारवाई करणार – मुख्यमंत्री