in

‘हा’ प्रकल्प हातातून जाता कामा नये, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

‘कोरोना काळानंतर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘ रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं कोणालाच परवडणार नाही. राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात राजकारण सुरू आहे. या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत असून, शिवसेनेचे स्थानिक नेतेही नागरिकांच्या भूमिकेला समर्थन देताना दिसत आहेत. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.

या पत्रात रत्नागिरी- राजापूर रिफायनरी प्रकल्पांना मान्यता देण्याबद्दल विनंती करण्यात आली आहे. शासनाने हा प्रकल्प होऊ दिल्यास मनसे पूर्ण सहकार्य करेल, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबतच हे पत्र शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांना देखील लिहिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ‘ईडी’कडून अटक

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश