in

फुटबॉल जगतातला ‘हा’ दिग्गज खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

Share

कोरोनाचा शिरकाव आता विविध क्रीडा क्षेत्रातही झाला आहे. आयपीएलचे काही खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर आता फुटबॉल जगतात ही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडा फुटबॉल खेळाडू असलेल्या नेमारला कोरोनावायरसची लागण झाली आहे. त्याची कोविड-19 चाचणी करण्यात आली त्यामध्ये तो पॉझिटीव्ह आढळून आला आहे. नेमार याच्यासोबत अर्जेंटीनाचा फुटबॉल खेळाडू एंजेल डी मारिया आणि लियोनार्डो पारेडेस हे खेळाडू सुद्धा पॉझिटीव्ह आढळले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील 14 दिवस नेमार हा त्याच्या बोगीवल येथील घरात क्वारंटाईन राहणार आहे. कोरोना व्हायरस संसर्गामुळे 10 सप्टेंबरला होणाऱ्या हंगामातील पहिल्या PSG गेममध्ये नेमार सहभागी होणार नाही. PSG चा हा सामना लेन्स सोबत होणार होता.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

वाटेवरचा ”पाडुरंग” गेला…

पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात