in

असा बनला भारत विश्वविजेता; जाणून घेऊयात 37 वर्षांपूर्वीचा इतिहास

Share

क्रिकेट विश्वात भारताने आतापर्यत दोन विश्वचषक जिंकून विश्वविजेत्याचा मान पटकावला होता. या विश्वचषकातले दोन्ही क्षण भारतीयांसाठी अविस्मरणीय होते. त्यामुळे आज हि विश्वचषक आठवला तर धोनीने 2011 साली शेवटच्या चेंडूवर लागवलेल्या सिक्सरची सर्वानाच आठवण होते.त्याचसोबत 1983 साली झालेल्या विश्वचषकातील कपिलच्या चेह्र्यावरचं हास्य आणि हातात धरलेला वर्ल्ड कप चाहत्यांना अजूनही आठवत आहे.

आजच्या दिवशी भारताने 1983 चा विश्वचषक पटकावला होता. दोन वेळा विश्वचषक जिकून हॅट्ट्रिक करायच्या मनस्थिती असलेल्या त्या काळच्या बलाढ्य अशा वेस्ट इंडिजचा भारताने पराभव करून विश्वचषकावर नाव कोरले होते.लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने हि किमया केली होती. या विश्वचषकानंतर भारतीय भारतीय क्रिकेटचे भविष्य बदलून गेले होते. या विश्वचषकाला पटकावून आता 37 वर्ष उलटली आहेत.त्यामुळे या विश्वचषका मागचा इतिहास जाणून घेऊयात.

इंग्लंडमधील लॉर्ड्स येथे झालेल्या 1983 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत फक्त 183 धावांवर ऑलआऊट झाला होता, त्यामुळे खेळाडूंसोबत चाहत्यांनाही त्यांच्या विजयाची आशा नव्हती. मात्र, कपिल यांनी कुशल नेतृत्व आणि टीमने आपल्या खेळाने पराभवाच्या तोंडून विजय खेचून आणला.भारताने वेस्ट इंडीजच्या मजबूत संघाला 43 धावांनी पराभूत केले. 183 सारख्या छोट्या स्कोरवर ऑलआऊट झाल्यावरही कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने वेस्ट इंडिजला 140 धावांवर ऑलआऊट केले आणि विश्वचषकमध्ये त्यांचे अधिराज्य गाजवले. कपिल देव, संदीप पाटील, मदन लाल, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, रॉजर बिन्नी यांनी वैयक्तिकरित्या स्पर्धेत आपली प्रभावी कामगिरी केली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Sai Tamhankar Birthday Special: वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकर हिच्या बोल्ड फोटोजची झलक!

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण