in

‘हा MPSC परीक्षार्थीवर अन्याय’;पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. यावर विरोधी पक्षनेत्यांसह सत्ताधारी नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत असताना त्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात काय अर्थ आहे. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्यादृष्टीने अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी सरकारचीच शाळा घेतली.

MPSC परीक्षेबाबत अशाप्रकराची अनिश्चितता योग्य नाही. विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा. राज्यात अधिवेशन आणि लग्नसमारंभ पार पडतात. मग एकट्या विद्यार्थ्यांनाच शिक्षा देणे योग्य नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. हे विद्यार्थी भावी प्रशासकीय अधिकारी आहेत. ते परीक्षेच्यावेळी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021: विराट कोहलीच्या RCB संघातून स्टार खेळाडूची माघार

corona vaccine : PM मोदींच्या आई हिरा बेन यांनी घेतली कोरोना लस