in

आयपीएलची उत्सुकता; ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती

Share

देशातील क्रिकेटप्रेमींना आयपीएलची आतुरता लागली असतानाच, एका दिग्गज क्रिकेटपटू निवृत्ती जाहीर केली आहे.आयपीएलचा विजेता रजत भाटियाने बुधवारी तातडीने प्रभावीपणे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

रजतच्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात हि दिल्लीतुनच झाली. वयोगट स्पर्धा दिल्लीकडून खेळताना त्याने चांगले नाव कमावले. ५० पेक्षा जास्त सरासरी राखत तो १९ वर्षाखालील क्रिकेट गाजवत होता. पण, चांगली कामगिरी करून देखील त्याला दिल्ली संघात स्थान मात्र मिळत नव्हते. अशावेळी त्याने तामिळनाडू रणजी संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. 20 वर्षी, १९९९ च्या रणजी मोसमात त्याने तामिळनाडूसाठी पदार्पण केले. पुढील पाच वर्ष सलगपणे तो तमिळनाडू संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून खेळत होता.

२०११ च्या लिलावात कोलकाता संघ व्यवस्थापनाने त्याला चांगली किंमत देत विकत घेतले. यादरम्यान संघा सोबत खेळताना कोलकाताने २०१२ आयपीएलचा किताबही जिंकला. कोलकातासाठी जशी कामगिरी केली तशीच कामगिरी २०१४ पासून दोन वर्ष राजस्थानसाठी त्याने केली. यावेळी त्याने दिल्लीसाठी ८१ प्रथम श्रेणी सामने खेळताना ४६६६ धावा व ९६ बळी घेतले होते. २०१६ व २०१७ साली रायझिंग पुणे सुपरजायंट संघासाठी त्याने खेळायला सुरुवात केली. २०१७ मध्येच तो आपला अखेरचा आयपीएल मोसम खेळला.

रजतने आयपीएलमध्ये ९५ सामने खेळत फक्त ३४५ धावा काढल्या. मात्र, गोलंदाजीत ७१ बळी घेत अवघ्या ७.१ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.रजत भाटियाने ११२ प्रथम श्रेणी सामन्यात ६,४८२ धावा व १३७ बळी घेतले.‌ तसेच, ११९ लिस्ट ए सामने खेळताना ३०३८ धावा व ९३ बडी आपल्या खात्यात जमा केले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

70 च्या दशकातील बॉलीवूडच्या ‘मदर इंडिया’ सुलोचनादीदींचा आज वाढदिवस…

Samsung Galaxy M31s च आज लाँचिंग; पाहा फीचर्स आणि किंमत