in

हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे; देवेंद्र फडणवीसांचा टोला

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने आम्ही वीज जोडणी कापणार नाही. त्याला स्थगिती दिली आहे, असे सांगितले होते. पण शेवटच्या दिवशी अतिशय थातूरमातूर निवदेन करुन पुन्हा एकदा वीज जोडणी कापणी सुरु केलं आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. तसेच यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे, हे स्पष्ट झालं आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना टोचणारे आणि बोचणारे मुद्दे आम्ही उचलले. जनहिताचे मुद्दे उचलले ही आमची जबाबदारी आहे, तशीच वृत्तपत्राचीही आहे. आम्ही कोवीड, शेतकरी, गरिबांबाबत बोललो. हे त्यांना दिसले नाही. त्याबद्दल सामनात अग्रलेख आला. त्यामुळे घाव वर्मी बसला आहे, हे लक्षात आलं, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

या अधिवेशनात काहीही मिळालं नाही. सर्वात जास्त विदर्भ आणि मराठवाड्याची निराशा झाली आहे. कोरोना वाढतोय, सरकारचं याकडे लक्ष नाही, सरकारचं नियोजन नाही. अधिवेशनाच्या आधी कोरोना वाढतो, अधिवेशनात कमी होतो आणि अधिवेशनानंतर पुन्हा वाढतो, सरकारला अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला आग

Petrol-Diesel Price | पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर