in

जनतेच्या खिशात काही टाकत नाहीत, आहे ते तरी कशाला ओरबडता…? शिवसेनेच्या सामनातून केंद्र सरकारला सवाल

लोकशाही न्यूज नेटवर्क

पेट्रोल डिढेल दरवाढीवरुनआजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पेट्रोल-डिझेलवर ‘कृषी उपकर’ लावला. त्यामुळे दरवाढ होईल असे चित्र निर्माण झाले. तेव्हा पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार नाही, असे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र हे शब्द हवेत विरत नाहीत तोच पेट्रोल-डिझेलच नव्हे तर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढले आहेत” पेट्रोल-डिझेलच्या किमती 35 ते 37 पैशांनी वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्यात आल्याने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत जसे चढ-उतार होतात तसे आपल्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दरही कमी-जास्त होतात हे खरे आहे. मात्र, येथे प्रश्न आहे सरकारने दिलेल्या शब्दाचा.

चार दिवसांपूर्वी सरकारचे एक मंत्री म्हणाले की, पेट्रोल-डिझेलवर लावलेल्या कृषी उपकराचा कोणताही परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर होणार नाही. मग चारच दिवसांत ही दरवाढ कशी झाली? असा सवाल सामनातून केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे. सरकार आता इंधनाच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय बाजाराकडे बोट दाखवून स्वतःचा बचाव करीलही, पण घरगुती गॅसच्या मोठय़ा दरवाढीचे काय? सत्ताधाऱ्यांची ही शब्दांची ‘जुमलेबाजी’ देशाला नवीन नाही. केंद्रातील सरकार सांगते एक आणि करते भलतेच असाच एकंदर प्रकार आहे.

जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर जेवढे काही शिल्लक आहे ते कशाला ओरबाडता? घरगुती गॅस सिलिंडर थेट 25 रुपयांनी वाढला आहे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत पाच रुपयांनी घट झाली आहे. किंमत धोरणाचा हा कोणता प्रकार आहे?” असा सवाल सामनातून केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बुलेट ट्रेनसाठी ७,८९७ कोटींची तरतूद

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव