in ,

Monsoon 2021 | रायगडात पावसाचा जोर नाही मात्र रेड अलर्ट कायम

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असला तरी पावसाचा जोर दिसत नाही. जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या किरकोळ सरी येत आहेत. आकाशात ढग दाटून आले आहेत. पाऊस नसला तरी जिल्ह्यात रेड अलर्ट कायम आहे. जिल्ह्यात आजही संचारबंदी आणि लॉकडाउन आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दरडग्रस्त, किनारपट्टीवरील गावे तसेच जुन्या इमारतींमधील जवळपास दीड हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलंय.

जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलंय. मदतीसाठी एन डी आर एफ च्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल असून त्या महाड व पेण इथं सज्ज आहेत. महाड तालुक्‍यातील पाचशेहून अधिक घरांना दरडींचा धोका असल्याने याठिकाणच्या सर्वाधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतीसाठी विहिर खोदली; पाण्यात आढळला मृतदेह

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागल्या वस्तू… !