in

मुंबईत आज कोरोना लसीकरण नाही

महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मुंबईत कोविड लसीकरण मोहिमेला वेग आला असतानाच आज मुंबई महापालिका क्षेत्राल लसीकरण होणार नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिकेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरही याविषयीचे ट्वीट करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणाचा सध्या तिसरा टप्पा सुरू असून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच सहआजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील व्यक्तींना या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.

मुंबईत पालिकेने यासाठी अधिकृत लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. त्यासोबतच २९ खासगी रुग्णालयांतही लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. या सर्वच ठिकाणी सध्या युद्धपातळीवर लसीकरण केले जात आहे. मात्र मुंबईत आज दिवस लसीकरण होणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हापूस आंब्याला 1 लाखांचा विक्रमी भाव

जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगावात आज मराठा आक्रोश मेळावा