in

वडिलांच्या अस्थिपासून तयार झालेल्या राखेतून युवतीने साकारला टॅटू

प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असते. त्यात वडिलांची भूमिका सर्वात महत्वाची मनाली जाते. अनेक मुलं-मुली आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आयुष्यात मार्गक्रमण करताना त्यांनी दिलेले संस्कार, शिकवण याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असतो. मुलापेक्षा मुलगी ही आई वडिलांच्या नात्यात प्रेम, जिव्हाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळजीपूर्वक हे नातं घट्ट करण्याचा प्रयत्न करते.

आपल्या वडिलांच्या मृत्यू पश्चात आपल्याला दिलेली शिकवण कायम स्मरणात राहावी याभावनेतून नाशिकच्या मेघा वर्मा ह्या युवतीने त्यांच्या अस्थिपासून तयार झालेल्या राखेतून टॅटू साकारले आहे. आयुष्यात कोणाला घाबरू नये आणि कोणाचा द्वेषही करू नये, ही शिकवण मेघाला तिच्या वडिलांनी दिली होती. तिच शिकवण तिने पंजाबी भाषेतून आपल्या पाठीवर कोरली आहे. वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मेघा वर्मा हिने आपल्या पाठीवर टॅटूच्या माध्यमातून “निर्भीओ निर्भय” हे नाव सरकारल आहे. ह्या टॅटूतून माझे वडील आयुष्यभर माझ्या सोबत राहतील असा विश्वास तिने व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवारांबद्दल टि्वटरवर आक्षेपार्ह मजकूर; दोघांवर गुन्हा दाखल

Raj Bhavan Updates : भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला दाखल…निवेदनात महत्वाचे मुद्दे मांडले