in , ,

कोरोनापुढे महासत्ताही हतबल! अमेरिकेत मागील २४ तांसात १८८३ मृत्यू

Share

वॉशिंग्टन: कोरोनाच्या विषाणूचा जगभरात धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनामुळे जगभरातील बळींच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनामुळे ६५ हजारांहून अधिक बळी गेल्याचे भीषण वास्तव समोर आहे. कोरोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासात अमेरिकेत १ हजार ८८३ जणांचा मृत्यू झालाय. अमेरिकेतील जॉन हॉप्कीन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या १० लाखांहून अधिक झालीय. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे.

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिकासह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २,२८,३९४ लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. तर ३,२३०,४३३ लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर १,००७,१३६ लाखांहून अधिक लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

इटलीत आतापर्यंत २ लाख ०७ हजार ४२८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर २८ हजार २३६ जण दगावले आहेत. स्पेनमध्ये २ लाख ४२ हजार ९८० जणांना कोरोनाची बाधा झाली असून, २४ हजार ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही ३७ हजार ३३६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, १२२३ जण दगावले आहेत. तर १०,००७ रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, २६ हजार १०६ ऍक्टिव्ह केसेस आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पुण्यात ६८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू, जिल्ह्यात रुग्णसंख्या १ हजार ८१५ वर

RBI कडून ‘या’ बँकेचा परवाना रद्द! फसवणूक झाल्याचा खातेदारांचा आरोप