in

नेमबाजीत खेळाडूंची दमदार कामगिरी; तिन्ही पदकं भारताच्या खात्यात

नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शुटिंग रेज येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिन्ही पदकं भारताने पटकावली. चिंकी यादव सुवर्णपदक, राही सरनोबत रौप्य तर, मनू भाकरने कांस्यपदक पटकावले आहे. त्यामुळे आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी तिनही खेळाडूंनी पात्रता दर्शवली आहे.

या स्पर्धेत भोपाळच्या 23 वर्षीय चिंकी यादवने महाराष्ट्राच्या राही सरनोबत आणि मनू भाकेरला धक्का देत सुवर्णपदकावर नाव कोरले. तर नेमबाजीच्या या प्रकारात 19 वर्षीय राहीला रौप्य तर, मनू भाकेरला कांस्यपदक मिळाले आहे. या स्पर्धेतील 25 मीटर पिस्तुल प्रकारातील तिन्ही पदके भारताला मिळाली आहेत. तसेच चिंकीच्या सुवर्णपदकामुळे भारताकडे आता एकूण 9 सुवर्णपदके झाली आहेत.

कोल्हापूरमधल्या राही सरनोबतने 25 मीटर पिस्तुल नेमबाजीच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. 2019 साली जर्मनीमधल्या म्युनिच शहरात झालेल्या ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने 25 मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आणि 2021 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये तिचं स्थान निश्चित झालं. नेमबाजी क्रीडा प्रकारात देशाचं नाव उंचावणाऱ्या राहीला 2018 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी मनू भाकरने आंतरराष्ट्रीय स्पर्धा फेडरेशन वर्ल्ड कप स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल – महिला या प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. असं करणारी ती सर्वात कमी वयाची भारतीय बनली.मनू भाकरने 2018 च्या युथ ऑलिम्पिक्समध्येही सुवर्णपदक जिंकलं होतं.त्याच वर्षी तिने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात 240.9 पॉइंट्स मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. 2019 मध्ये तिने नेमबाजीच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये याच प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.

तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात युवा नेमबाजपटू ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने 50 मीटर रायफल 3 पोजिशन इवेंट या प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. भोपाळच्या ऐश्वर्यने 462.5 शॉट्ससह प्रथम क्रमांक मिळवला. हंगेरीच्या इस्वान पेनी दुसर्‍या आणि स्टीफन ऑल्सेनने कांस्यपदक जिंकले. संजीव राजपूत आणि नीरज कुमार या भारतीय नेमबाजपटुंना सहाव्या आणि आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ऐश्वर्य आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आनंदाची बातमी! बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 150 पदांची भरती

पोलिसांच्या मध्यस्थी नंतर 70 वर्षीय वृद्ध गेली मुलाच्या घरी