in

Corona Virus : नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा 30 हजार पार

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा आज पुन्हा 30 हजारांच्या पार गेला. देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या 10 जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातील चिंता वाढली आहे.

दिवसभरात राज्यामध्ये 31 हजार 855 नव्या रुग्ण आढळले. कालच्या तुलनेत 3 हजार 156 रुग्णांची संख्या जास्त आहे. याआधी 21 मार्च रोजी राज्यात 30 हजार 535 रुग्ण सापडले होते. यामुळे एकूण करोनाबाधितांचा आकडा 25 लाख 64 हजार 816 इतका झाला आहे. यापैकी 2 लाख 47 हजार 299 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज एकूण 15 हजार 98 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.काल ही संख्या 13 हजार 165 इतकी होती. तर आतापर्यंत एकूण 22 लाख 62 हजार 593 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.21 टक्के झाले आहे. आज एकूण 95 करोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल 132 इतकी होती. यामुळे मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

निकिता तोमर हत्या प्रकरण : तौसिफ आणि रेहानला ठरवलं हरियाणा कोर्टाने दोषी

सारथी संस्थेला पुण्यात शिवाजीनगरमध्ये मिळणार जागा, मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय