in ,

राज्यात कोरोनाच्या 37 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरू, मृत्यूंची संख्या 1897 वर

Share

मुंबई: राज्यात आज कोरोनाच्या 2190 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 37 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 964 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत 17 हजार 918 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 56 हजार 948 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात 72 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1897 झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 32, ठाण्यात 16, जळगावमध्ये 10, पुण्यात 9, नवी मुंबई मध्ये 7, रायगडमध्ये 7,  अकोल्यात 6, औरंगाबाद मध्ये 4, नाशिक 3, सोलापूरात 3, सातारा 2, अहमदनगर 1, नागपूर 1, नंदूरबार 1, पनवेल 1 तर वसई विरारमध्ये 1 मृत्यू झाला आहे. या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 72 पुरुष तर 33 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 105 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 50 रुग्ण आहेत तर 45 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 10 जण 40 वर्षांखालील आहे. या 105 रुग्णांपैकी 66 जणांमध्ये (63 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 03 हजार 976 नमुन्यांपैकी 56 हजार 948 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 82 हजार 701 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 37 हजार 761 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Live | ‘युद्ध कोरोनाविरुद्ध’ मध्ये गायिका नंदिनी आणि अंजली अंगद गायकवाड लोकशाही न्यूजवर…

COVID 19 | सायन रुग्णालायातील एक महिन्याचे बाळ कोरोनामुक्त