आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे.
कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. जनतेला दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का, हे महत्वाचे आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल 7 मार्चला मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
Comments
Loading…