in ,

देशभरात कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढला, देशात कोरोनाचे २७,८९२ रुग्ण

Share

नवी दिल्ली: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक प्रसार झालेला नाही. मात्र काही शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 892 वर पोहोचला आहे. 

त्यापैकी २०,८३५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ६१८५ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलीय. गेल्या २४ तासात १३९६ रुग्णांची नव्याने भर पडलीय. तर ४८ जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत कोरोनामुळे ८७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना प्रतिबंधासाठी जी लस विकसित केली आहे, त्याचे उत्पादन पुढील दोन ते तीन आठवड्यात आम्ही सुरू करू, मानवी वैद्यकीय चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध होईल, असे पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे. दरम्यान, जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २९ लाखांवर तर २ लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

उद्या पंतप्रधानांसह व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देशातील ‘ही’ ९ राज्ये बोलण्याची शक्यता

मिरा भाईंदरात शहरात २४ तासात नव्या १३ रुग्णांची ; ३ आणि ५ वर्षाच्या मुलांचा समावेश