in

पुलवामा हल्ल्याचा दुसरा कट उधळला, सात किलो स्फोटकं जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क

सुरक्षा दलाने पुलवामातील दुसरा हल्ल्याचा कट उधळला असून जम्मू मध्ये सात किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. बरोबर दोन वर्षापूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांनी कश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफ च्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता.

या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. आज पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा हा कट उधळला असून सात किलो RDX म्हणजेच स्फोटकं जप्त केली आहेत. सुरक्षा दल आज साडे चार वाजता पत्रकार परिषद घेऊन याबद्दल विस्तृत माहिती देणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुलवामा… एक भ्याड हल्ला

ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण : दिशा रवी बंगळुरूतून ताब्यात