अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेच्या फेब्रुवारी सत्राचा निकाल काही तांसामध्ये जाहीर केला जाईल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
जेईई मेन फेब्रुवारी सत्राच्या jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.
असा पाहा निकाल ?
- jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईट वर जा.
- या वेबसाईटवर JEE Main Feb Result या ऑप्शनवर क्लिक करा.
- तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा.
- यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
- निकाल तपासून प्रिंट काढा.
Comments
Loading…