in

चंबळ नदीत प्रवासी असलेली बोट उलटली; 14 जणांचा मृत्यू

The passenger boat capsized; 7 killed, 14 missing
The passenger boat capsized; 7 killed, 14 missing
Share

राजस्थानमधील बूंदी जिल्ह्याच्या सीमालगत भागात असलेल्या गोठडा कला गावाजवळ प्रवाशांनी घेऊन जाणारी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. बुडालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचा शोध घेण्यात येत आहे.

चंबळ नदीत बोट उलटली असून बोटीमध्ये जवळपास 25 ते 30 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बोट उलटल्याचं दिसताच तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी बुडालेल्या लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच तातडीने या घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला देण्यात आली. पोलीस आणि NDRF टीम घटनास्थळी दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर काहींचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Onion Export Ban: Statewide agitation of Congress against onion export ban

Onion Export Ban: कांदा निर्यात बंदीच्या विरोधात काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन

तीन-चार आठवड्यात येईल कोरोनाची लस; ट्रम्प यांचा मोठा दावा