in ,

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ३३ हजारांच्या पलीकडे, गेल्या २४ तासात १७१८ रुग्णांची भर

Shocking increase in corona patients in the state
Shocking increase in corona patients in the state
Share

नवी दिल्ली: देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ०५० वर पोहचली आहे. तर आतापर्यंत १०७४ जणांचा मृत्यू झाला आहे. २३,६५१ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ८३२५ लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनामुळे ६७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १७१८ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेला देशव्यापी लॉकडाउन येत्या ३ मे रोजी संपला तरी निदान कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी तरी त्यानंतरही निर्बंध सुरू राहावेत. अशा मतापर्यंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पं. बंगाल, पंजाब, ओडिसा व दिल्ली ही सहा राज्ये आली असल्याची माहिती मिळते. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अभिनेते ऋषी कपूरची ‘ही’ चित्रपटे गाजली

चित्रपट सृष्टीच्या दोन पिढ्यांतील दूवा निखळला, ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली