in

कोरोनाबाधितांचा आकडा 58 लाखांच्या पार

Share

देशात कोरोना बाधितांचा रिकव्हरी रेट वाढत असला तरी रुग्णांचा आकडा नियंत्रणात येत नाही आहे. कारण देशात कोरोनाबाधितांच्या संख्येनं 58 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे त्याच तुलनेत विक्रमी विक्रमी चाचण्यांचीही नोंद असल्याने दिलासा मिळत आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार , गेल्या चोवीस तासांमध्ये देशात 86 हजार 052 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 1 हजार 141रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील करोनाबाधितांच्या एकून संख्येनं 58 लाख 18 हजार 571वर पोहोचली आहे. देशात सध्या 9 लाख 70 हजार 116 रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 47 लाख 56 हजार 165 जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 92 जार 290 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

13 लाखांहून अधिक चाचण्या

देशातील कोरोनाच्या चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 13 लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहे. दिवसभरात 13 लाख 80 हजार चाचण्या करण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या चौकशीला सुरुवात

एस.पी. बालसुब्रमण्यम याचं निधन;सूरांचा बादशाह हरपला