in ,

बापरे…देशात कोरोनाबाधितांचा आकडा 9 लाखाच्या पार

Share

जगभरासह देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता देशात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ही 9 लाखाच्या पल्ल्याआड गेली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

देशात मागील 24 तासांत 28 हजार 498 नवे रुग्ण आढळले असून, 553 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.यामुळे देशभरातील करोनाबाधितांची संख्या आता 9 लाख 6 हजार 752 वर पोहचली आहे. यामध्ये अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 3 लाख 11 हजार 565 असून, आतापर्यंत 5 लाख 71 हजार 460 जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत देशभरात 23 हजार 727 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता आलेख
भारतानं 166 दिवसांत 9 लाखांचा आकडा पार केला आहे. 19 मे रोजी 110 दिवसांत देशात 1 लाख 01 हजार 139 रुग्ण होते. हा आकडा 3 जून रोजी 2 लाखांच्या घरात गेला. 13 जून रोजी 10 दिवसांत देशानं 3 लाखांचा आकडा पार केला. तर, पुढच्या 8 दिवसात म्हणजे 21 जून रोजी देशात 4 लाख कोरोना रुग्ण होते. त्यानंतर 6 दिवसांत भारतानं 5 लाखांचा आकडा पार केला. विशेष म्हणजे 14 दिवसांत देशात तब्बल 4 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

Who चा इशारा
को नामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे काही देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र या देशांना जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर इशारा दिला आहे. कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली असून, शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असा इशाराच दिला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

आता ‘या’ अभिनेत्रीच्या बंगल्यात शिरला कोरोना

ओळखलंत का? मराठमोळी अभिनेत्री आणि संगीतकाराचे शुभमंगल!