in , ,

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकडा वाढताचं

Share

राज्यात कोरोना रूग्णांची आकडेवारी दिवसागणिक वाढतच चालली आहे. आज पुन्हा जवळपास 6,406 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याच्या चिंतेत पुन्हा भर पडताना दिसतेय.

आज राज्यात 6 हजार 406 कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 2 हजार 365 वर पोहोचली आहे. तर 4 हजार 815 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे एकूण 16 लाख 68 हजार 538 जणांनी कोरोनावर मात केली. तसेच 65 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे 46 हजार 813 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

पुण्यात रुग्णसंख्येत वाढ

पुणे शहरात दिवसभरात 430 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्याही 1 लाख 68 हजार 460 इतकी संख्या झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही आज दिवसभरात 239 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 85 जण करोनामुक्त झालेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

असा ‘नटसम्राट’ होणे नाही! पुन्हा झळकणार चित्रपटगृहात

विमानाने दिल्लीहून नागपुरात आलेले 12 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह