in ,

राज्यात कोरोना रुग्णसंख्या १२,२९६ वर; आज ७९० नवे रुग्ण, ३६ जणांचा मृत्यू

Share

मुंबई: राज्यात आज कोरोनाने तब्बल ३६ बळी घेतलेत. तर ७९० नवे रुग्ण वाढलेत. त्यात दिलासादायक बातमी म्हणजे आज दिवसभरात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील २ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दोन दिवसांपासून वाढ होत असल्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.

७९० रुग्ण वाढल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार २९६ झालीय. तर राज्यातील मृतांची संख्या आता ५२१ वर गेलीय. आज होम क्वारंटाईन केलेल्यांमध्ये वाढ होऊन ती १ लाख ७४ हजार ९३३ झालीय. तर संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांचा आकडा आता १२ हजार ६२३ झालाय. आज राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २७ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात, २ अमरावतीत, वसई-विरारमध्ये १, अमरावती जिल्ह्यात १, तर औरंगाबाद मनपातील १ मृत्यू आहे. या शिवाय प. बंगालमध्या एकाचा मृत्यू मुंबईत झाला आहे.

आज झालेल्या ३६ मृत्यूंपैकी २८ पुरुष तर ८ महिला आहेत. ३६ पैकी १९ रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे आहेत. तर १६ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील तर एक जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी तिघांची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कालच करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. आणखी दोन आठवडे म्हणजेच १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन कायम असणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

COVID-19 | मालेगावात १४ नवे कोरोनाबाधित, ७ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

सील असूनही धारावीत ३८ नवे रुग्ण, धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या ४९६ वर