in ,

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३० हजारांच्या अलीकडे, आज कोरोनाचे १,५७६ नवे रुग्ण

Share

मुंबई: राज्यात आज कोरोनाचा विळखा जास्तच वाढ चालला आहे. गेल्या २४ तासात तब्बल १,५७६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ४९ कोरोनारुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता २९ हजार १०० वर पोहचलीय. राज्यात सध्या २१,४६७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि मृतांची संख्याही एक हजाराच्या वर म्हणजे १ हजार ६८ झालीय. आज दिलासा देणारी बातमी म्हणजे ५०५ कोरोनारुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्यआ ६ हजार ५६४ झालीय.

आज झालेल्या ४९ मृत्यूंपैकी ३४ मृत्यू मुंबईत, ६ मृत्यू पुण्यात, १ मृत्यू औरंगाबादमध्ये, १ मृत्यू पनवेलमध्ये आणि २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत, अकोल्यात २ तर जळगाव मध्ये १ मृत्यू झाला आहे. ४९ मृत्यूंपैकी २९ पुरुष आणि २० महिला होत्या. यापैकी २२ जणांचं वय हे ६० वर्षे वयाच्या वरचे होते. २३ जणांचं वय ४० ते ५९ या वयोगटातलं होतं. तर ४ जणांचं वय ४० वर्षे वयाच्या खालील होते. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये (६५ टक्के) मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब असे गंभीर आजार होते.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २,५०,४३६ नमुन्यांपैकी २,२१,३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९, १०० जण पॉसिटीव्ह आले आहेत. राज्यात सध्या १४७३ कंटेनमेंट झीन क्रियाशील असून आज एकूण १४,१६७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५८.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ३,२९,३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १६,३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

गोरेगाव येथील एक हजार खाटांच्या ‘कोरोना काळजी केंद्रा’ची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

क्रिकेट चाहत्यांना बसणार मोठा धक्का?