in ,

देशात कोरोना रुग्णांची संख्या ३० हजारांजवळ, प्लाझ्मा थेरपीला परवानगी नाही – आरोग्य मंत्रालय

Share

नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ इतकी आहे. मात्र, चांगली बातमी म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो २३.३ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे १,५९४ नवे रुग्ण आढळले आहेत तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण २२, ०१० रुग्णांवर उपचार सुरू असून ७,०२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असे अग्रवाल म्हणाले. तर आत्तापर्यंत देशात ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६८४ इतकी आहे.

गेल्या २८ दिवसांमध्ये देशभरातील १७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नसल्याचेही ते पुढे म्हणाले. या जिल्ह्यांच्या यादीत एका जिल्ह्याचे नाव गळले असून आणखी दोन जिल्ह्यांची नावे जोडली गेली आहेत. यात पश्चिम बंगाल राज्यातील कलिमपोंग आणि केरळमधील वायनाड या जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. तर, बिहारमधील लखीसराय या जिल्ह्यात एक रुग्ण आढळल्याने या जिल्ह्याचे नाव या यादीतून वगळण्यात आले आहे.

आयसीएमआरच्या अहवालानंतर प्लाझ्मा थेरपीबाबत निर्णय होईल:

प्लाझ्मा थेरपी हा देशभर चर्चेचा विषय झाला आहे. सध्या प्लाझ्मा थेरपीबाबत प्रयोग सुरू आहेत, आणि आयसीएमआर याबाबतची अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने प्रयोग करत आहे. कोरोनावर उपचार करताना प्लाझ्मा थेरपीच्या सफलतेचा कोणताही पुरावा नसल्याचे महत्त्वपूर्ण विधान लव अग्रवाल यांनी केले आहे. परवानगी नसेल तर कुणीही प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करू नये असेही ते म्हणाले. कारण तसे करणे हे रुग्णांसाठी धोकादायकही ठरू शकते आणि ते बेकायदेशीरही आहे, असेही अग्रवाल पुढे म्हणाले.

काय आहे प्लाझ्मा थेरपी?

  • यात अँटीबॉडीचा वापर केला जातो. त्यामुळे याला प्लाझ्मा थेरपी तसंच अँटीबॉडी थेरपी म्हटलं जातं
  • ज्या व्यक्तीला विषाणूची लागण झालेली असते आणि त्यातून तो पूर्ण बरा होतो अशा व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात
  • अँटीबॉडीच्या भरवशावरच रुग्ण बरा होतो

प्लाझ्मा थेरपीचा वापर कसा केला जातो?

  • विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्ण जेव्हा बरा होतो तेव्हा त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात
  • बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडी काढून दुसऱ्या आजारी रुग्णाच्या शरीरात टाकल्या जातात
  • अँटीबॉडी शरीरात प्रवेश करताच रुग्णाच्या प्रकृतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन विषाणूचा प्रभाव कमी होऊ लागतो
  • अँटीबॉडीमुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढीस लागते

सध्या राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. मात्र कोरोना रुग्णांची वाढ होण्यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. त्यामुळे इथे ३ मेनंतरही लॉकडाउन कायम राहण्याची शक्यता आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य पदाची शपथ

यवतमाळ कोरोना रुग्णांच्या शंभरी जवळ! कोरोना ग्रस्तांची संख्या ८५ वर