नवी दिल्ली: जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशभरात अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ४९ जणांचा करोनाने बळी घेतला असून, १ हजार ९९० नवे रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांचा संख्या २६ हजार ४९६ वर पोहचली आहे.
देशभरातील एकूण कोरोनाबाधित २६ हजार ४९६ रुग्ण संख्येत सध्या उपचार सुरू असलेल्या १९ हजार ८६८ रुग्णांसह आतापर्यंत रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेल्या ५ हजार ८०४ जणांचा व मृत्यू झालेल्या ८२४ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.
Comments
0 comments